IPL 2026 CSK vs RR Preview | मोठा धक्का! धोनी, ब्रेव्हिस पहिल्या सामन्यातून बाहेर, तब्बल 17 वर्षांनी जडेजा भिडणार चेन्नईला

सध्या देशात आयपीएलची प्रचंड क्रेझ पाहायला मिळत आहे. आज आयपीएल 2026चा तिसरा सामना गुवाहाटीच्या ACA मैदानात चेन्नई आणि राजस्थान या संघामध्ये होणार आहे.

IPL 2026 CSK vs RR Preview | मोठा धक्का! धोनी, ब्रेव्हिस पहिल्या सामन्यातून बाहेर, तब्बल 17 वर्षांनी जडेजा भिडणार चेन्नईला

सध्या देशात आयपीएलची प्रचंड क्रेझ पाहायला मिळत आहे. आज आयपीएल 2026चा तिसरा सामना गुवाहाटीच्या ACA मैदानात चेन्नई आणि राजस्थान या संघामध्ये होणार आहे. 2025च्या निराशाजनक हंगामानंतर दोन्ही  संघानी नवीन संघ बनवला. लिलाव आणि ट्रेडिंगचा पुरेपूर वापर करत या दोन्ही संघानी आपापले संघ बळकट केले. 2025च्या हंगामात राजस्थान नवव्या क्रमांकावर होती तर चेन्नई दहाव्या स्थानी होती.  2025 आणि 2026या दोन आयपीएलच्या हंगामांमध्ये चेन्नईचे बरेचसे खेळाडू राजस्थानमध्ये गेले. आधीच्या हंगामात संजू सॅमसन राजस्थानकडून  खेळत होता. मात्र या हंगामात त्याला रवींद्र जडेजा आणि सॅम करन यांच्या बदल्यात चेन्नईत समाविष्ट करण्यात आला. 

चेन्नई आणि राजस्थान ऑनपेपर बलाढ्य संघ दिसत आहेत. मात्र मैदानावर चांगली कामगिरी करणं ही पूर्णपणे वेगळी गोष्ट ठरते. त्याचप्रमाणे चेन्नई संघातील खेळाडूंना झालेल्या दुखापती डोकेदुखी ठरू शकते. मध्यमगती गोलंदाज नेथन एलिस पूर्ण हंगामाला मुकणार आहे, तर गुडघ्याच्या दुखापतीने त्रस्त धोनी एप्रिलच्या शेवटच्या आठवड्यापर्यंत खेळण्यास पात्र होणार अशी माहिती सूत्रांकडून येत आहे. तर चेन्नईचा प्रशिक्षक स्टीफन फ्लेमिंग यांच्याकडून मिळालेल्या माहितीनुसार, दुखापतीमुळे डिवॉल्ड ब्रेव्हिसदेखील पहिला सामना खेळणार नाही. चेन्नईची फलंदाजी बाकीच्या संघासाठी डोकेदुखी ठरू शकते, मात्र चेन्नईची गोलंदाजी चेन्नईसाठीच डोकेदुखी ठरू शकते. विशेषकरून डेथ ओव्हर्समध्ये चांगली गोलंदाजी करणारे गोलंदाज तसेच चांगले खेळणाऱ्या फलंदाजांचा आभाव  यामुळे चेन्नईसाठी हा आयपीएलचा हंगाम निराशाजनक जाऊ शकतो, अशीदेखील एक शक्यता वर्तवली जात आहे. 

हेही वाचा –Shahrukh Khan : 14 वर्षांचा तो वनवास, आजतागायत शाहरुख खाननं ठेवलं नाही वानखेडेवर पाऊल…, ती घटना जिव्हारी लागली?

दुसरीकडे राजस्थानचा संघात अनेक युवा खेळाडू आहेत.  उत्कृष्ट कामगिरी करण्याची क्षमता असणारे भरपूर खेळाडू आहेत. यशस्वी जैस्वाल, वैभव सूर्यवंशी, रियान पराग, शिमरन हेटमायर, जोफ्रा आर्चर आणि रवींद्र जडेजा यांच्यावर बऱ्याच गोष्टी अवलंबून असणार आहेत. चेन्नईकडून संजू सॅमसनच्या बदल्यात घेतलेला सॅम करन मात्र संपूर्ण हंगामाला मुकणार आहे. त्याच्या जागी श्रीलंकेच्या दसून शनाका याला संघात समाविष्ट करण्यात आलं आहे. विशेष म्हणजे राजस्थानचा प्रशिक्षक श्रीलंकेचा  कुमार संगकारा आहे आणि त्याच्या राजस्थानसोबतच्या 3-4 वर्षांच्या कारकिर्दीत प्रथमच श्रीलंकेचा कोणीतरी खेळाडू खेळताना दिसणार. बाकी संघांच्या तुलनेत राजस्थानकडे स्टार खेळाडू नाहीत. जर राजस्थानला प्लेऑफ्ससाठी पात्र व्हायचं असेल, तर सगळ्या खेळाडूंना त्यांच्या क्षमतेपेक्षा एक स्तर वर जाऊन कामगिरी करावी लागेल.  
 

हेही वाचा – IPL 2026 RR vs CSK : आयपीएलच्या इतिहासात हे पहिल्यांदाच घडणार! CSK चे तिनही धुरंदर यंदा संघात नाही; आजच्या सामन्यात काय रणनिती?

Highlights 

  • राजस्थान रॉयल्स विरुद्ध चेन्नई सुपर किंग्स हा सामना धोनी किंवा सुरेश रैना यांच्याशिवाय सीएसकेचा पहिला सामना असेल.
  • वैभव सूर्यवंशीने आयपीएल 2025 मध्ये122 चेंडूंमध्ये 24 षटकार ठोकले. म्हणजेच सरासरी प्रत्येक पाच चेंडूंमागे एक षटकार
  • रवींद्र जडेजा टी-20 मध्ये 4000 धावा पूर्ण करण्यापासून 15 धावा दूर आहे. तो हार्दिक पांड्यानंतर टी-20 मध्ये 4000 धावा आणि 200 विकेट्सचा दुहेरी टप्पा पूर्ण करणारा दुसरा भारतीय खेळाडू बनेल.
  •  

खेळपट्टी आणि परिस्थिती: गुवाहाटीमध्ये पावसाचे वातावरण

  • सामन्यासाठी नवीन खेळपट्टी वापरली जाण्याची शक्यता आहे, जी सामन्याच्या आदल्या दिवशी पावसामुळे झाकण्यात आली होती. पावसामुळे रविवारी राजस्थान रॉयल्सचा सरावदेखील थांबवण्यात आला होता.

Advertisement
Home
Photo
Webstory
Videos
TV Number
TV Number
TV Number
TV Number